दोन दिवसाआड पाणी अजून दोन महिने मिळण्याची शक्यता नाहीच

Foto
छत्रपती संभाजीनगर ( सांजवार्ता ब्युरो ) : महानगर पालिकेच्यावतीने शहर वासियांना दोन दिवस आड पाणी देण्याचे आश्वासन राज्यकर्त्यांनी अनेकवेळा दिले होते. पण नवीन जल वाहिनी कामातील अनेक अडचणी अद्याप शिल्लक असल्याने अजून दोन महिने तरी नागरिकांना दोन दिवस आड पाणी मिळणार नाही असे सूत्रांनी सांगितले.     शहराची लोकसंख्या वाढल्यामुळे  नवीन जल वाहिनी टाकण्याचे काम गेल्या पंधरा वर्षापासून सुरू आहे.   सन २०५० पर्यन्त ची लोकसंख्या गृहित धरून मनपाने नवीन पाणी पुरवठा योजना आखली आहे. या कामाच्या आड सुरुवातीपासून अडचणी येत आहेत. कधी मनपातील प्रशासन आणि पदाधिकारी यांच्याकडून तर कधी कंत्राटदाराकडून संथ गतीने काम केले. जात आहे, त्यामुळे योजने काम कधी पूर्ण होईल याबाबत उच्च न्यायालयाने अनेक वेळा सुनावणी घेऊन कामकाजाचा आढावा घेतला. मनपा प्रशासन आणि कंत्राटदार कंपनी यांनी वेळोवेळी विविध तांत्रिक अडचणी सांगत वेळ मारून नेली. नवीन जल वाहिनीचे काम मार्च महिन्यात पूर्ण  होईल असे कंपनी कडून सांगण्यात येत आहे. पण जलवाहिनी ची चाचणी करणे बाकी आहे. तसेच नवीन विद्युत कनेक्शन घेणे बाकी आहे.या शिवाय बरीच कामे होणे बाकी आहेत त्यामुळे एप्रिल महिना उजाडेल अशी शक्यता वर्तवली आहे..